मुलाच्या वाढदिवशी रक्तगट तपासणी शिबिर,"प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी"



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेल : सध्या शाळा आणि कॉलेजचे प्रवेश सुरू झाले आहेत नव्याने प्रवेश घेताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप देणे अनिवार्य झाले आहे. यावेळी पालकांना शाळेजवळील लॅब शोधून तेथून रक्तगट तपासणी करावी लागत होती. यासंदर्भात पनवेल मधील विद्यार्थ्यांकरिता  जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून  श्री.प्रितम म्हात्रे यांनी त्यांचा मुलगा आराध्य याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीतून "मोफत रक्तगट तपासणी शिबिर " दिनांक 19 मे ते 19 जून असा संपूर्ण महिनाभर तीर्थरूप आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल च्या समोरील त्यांचे सेवालय ,दिपक क्लीनिकल लॅबोरेटरी शॉप नंबर 4, वास्तु श्री सोसायटी, पनवेल येथे आहे. तिथे हे शिबिर आयोजित केले आहे. तसेच प्रवेशादरम्यान इतर ऑनलाईन दाखले आणि सुविधांसाठी आपल्याला तिथून सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी त्यांनी दिपक कुदळे :-9930203100 हेल्पलाइन क्रमांक:-8334050505 / 7769050505/9326050505 / 8542050505 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

कोट

सध्या शाळा आणि कॉलेजमध्ये  प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यामुळे रक्तगट तपासणीसाठी पालकांना आपल्याकडून सुद्धा सामाजिक बांधिलकीतून काही सहकार्य करावे या अपेक्षेने मी हे शिबिर ठेवले आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी इतरही काही सहकार्य लागल्यास आमच्या कोणत्याही हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा पालकांना योग्य ते सहकार्य केले जाईल:- प्रितम जनार्दन म्हात्रे ,(मा.विरोधी पक्षनेता,पनवेल महानगरपालिका)

Post a Comment

Previous Post Next Post