डॉ.पद्माकर मते यांना भारतरत्न डॉ राधाकृष्णन गोल्ड मेडल अवॉर्ड



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

रसायनी मधील डॉ. पद्माकर मते यांना ग्लोबल ईकोनॉमिक प्रोग्रेस अँड रिसर्च असोसिएशन (गीप्रा), नवी दिल्ली यांच्यातर्फे ' वैद्यकशास्त्रातील उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी ' बद्दल  'भारतरत्न डॉ. राधाकृष्णन गोल्ड मेडल अवॉर्ड ' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

बंगळूरू येथील झियान हॉटेल येथे झालेल्या शानदार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी 'गीप्रा' चे जनरल सेक्रेटरी डॉ. आय. बाशा, युनिव्हर्सिटी ऑफ अग्रिकलचर- बंगळूरू चे माजी उप कुलपती डॉ. एच. शिवन्ना तसेच डिस्ट्रिक्ट आणि सेशन जज्ज श्री. राधाकृष्ण हुल्ला या मान्यवरांच्या हस्ते डॉ मते यांना सुवर्णपदक, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 

ग्रामीण भागासाठी विविध वैद्यकीय कार्यासाठी निःस्वार्थ योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. सावळे येथून परिसरातील १९८४ ला पहिल्या एमबीबीएस झालेल्या डॉ. मते यांनी वैयक्तिकरित्या वैद्यकीय सेवेत विविध प्रकारे योगदान देऊन ग्रामीण भागात कार्य केले आहे. प्रतिवर्षी प्रत्येक राज्यातून कोणत्याही दोन श्रेणीतील मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी महाराष्ट्रातून वैद्यकीय क्षेत्रातून डॉ मते यांच्याबरोबर डॉ प्रफुल्ल शिर्के, चार्टर्ड इंजिनिअर, मुंबई यांनाही गौरविण्यात आले. त्यांच्या या उत्कृष्ट सेवा पुरस्कारामुळे परिसरात त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post