इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त श्री. सुधाकर देशमुख नवभारत गृपच्या 'नवराष्ट्र गुड गव्हर्नन्स २०२३' या पुरस्काराने सन्मानित


 प्रेस मीडिया लाईव्ह :

     दै.नवभारत आणि दै.नवराष्ट्र ग्रुपच्या वतीने   प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण कार्य केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा 'नवराष्ट्र गुड गव्हर्नन्स २०२३' हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. 

    


इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी इचलकरंजी नगरपरिषदेचे इचलकरंजी महानगरपालिकेत  रुपांतर झाले नंतर केलेल्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्याची दखल घेऊन नवभारत गृपच्या वतीने त्यांना 'नवराष्ट्र गुड गव्हर्नन्स २०२३' चा आदर्श आयुक्त पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

        नवभारत ग्रुपचे एम.डी. श्री निमिश माहेश्वरी यांनी मुंबई येथे २९ मे रोजी आयुक्त श्री. सुधाकर देशमुख यांना सन्मानपत्र बहाल केले.


   

Post a Comment

Previous Post Next Post