राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला

 डिजिटल मीडियाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार - राजा माने

डिजिटल सह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र "श्रमिक पत्रकार" कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय.


प्रेस मीडिया लाईव्ह :

डिजिटल मीडियाला "श्रमिक पत्रकार"कक्षेत घेण्याच्या मंत्रीमंडळाच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले आहे . 

राज्यातील सर्वच पत्रकारांचे मित्र असलेले मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार तथा विशेष कार्यकारी अधिकारी विनायक पात्रुडकर तसेच मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आणि डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या भिलार महाबळेश्वर येथील ऐतिहासिक अधिवेशनात सहभागी होवून प्रश्न सोडविण्यासाठी आस्थेवाईकपणे बळ देणारे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, सांसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे विशेष आभार मानण्यात आले.

आपला,

-राजा माने,

संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.



Post a Comment

Previous Post Next Post