जेष्ठ नागरिक संस्थेच्या एकेरी कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रंजक सामने

 --मानांकित खेळाडू सहज विजयी

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  ( क्रीडा प्रतिनिधी ) 

जेष्ठ नागरिक संस्थेच्या एरंडवणे शाखेतर्फे घेण्यात येणाऱ्या *कै. घनश्याम सहस्त्रबुद्धे स्मृती करंडक एकेरी कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अनेक रंजक कॅरम सामने बघायला मिळाले.या स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी सहज विजय मिळविले.

पटवर्धन बाग परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानशेजारी असलेल्या विरंगुळा केंद्रात  ह्या कॅरम स्पर्धा चालू असून सकाळी दहा ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सामने चालू आहेत.

उद्या रविवार दिनांक २१ मे रोजी शेवटची फेरी असून दुपारी ४ ते ६ या वेळेत अंतिम फेरीचे सामने होतील व सामने संपताच लगेचच प्रथम आठ विजेत्यांना व  काही उत्कृष्ट खेळाडूंना विशेष पारितोषिके प्रदान करण्यात येतील असे स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी यांनी सांगितले.प्रमुख पाहुणे बांधकाम व्यावसायिक पंडित जावडेकर यांच्याहस्ते बक्षिसे व ट्रॉफी देण्यात येतील.

स्पर्धा यशस्वितेसाठी अजित गोखले,श्रीकांत पुराणिक,शिरीष जोशी,उर्मिला शेजवळकर,माधव तिळगुळकर,अभय अतकेकर, सतीश सहस्त्रबुद्धे,जयंत मुळ्ये,महेश साळी प्रयत्न करीत आहेत.

तिसऱ्या फेरीअखेरचे निकाल मुख्य पंच *विलास सहस्त्रबुद्धे* यांनी घोषित केले ते निकाल पुढीलप्रमाणे ...

राजाभाऊ ठाकरे विजयी विरुद्ध सूर्यकांत केसरकर १५-११,२५-७,

दीपक नरवडेकर विजयी विरुद्ध विजय करंदीकर ७-१४,२५-०,१३-३,

सुधाकर चव्हाण विजयी विरुद्ध अजित गोखले १३-५,१८-११

अजय पराड विजयी विरुद्ध मनोहर खरे १६-७,२५-०,

अभय अतकेकर विजयी विरुद्ध वसंत रत्नपारखी १८-७,१८-११

--------------------------------------------------

*फोटो ओळ*


फोटो क्रमांक १

कै घनश्याम सहस्त्रबुद्धे स्मृती करंडक कॅरम स्पर्धेत माधव तीळगुळकर विजयी विरुद्ध श्रीराम देसाई खेळतांना


फोटो क्रमांक २

कै घनश्याम सहस्त्रबुद्धे स्मृती करंडक कॅरम एकेरी स्पर्धेतील खेळाडू शिरीष जोशी विजयी विरुद्ध अनुपमा राजोपाध्ये

Post a Comment

Previous Post Next Post