कोल्हापूर येथील आरोग्य विभागाच्या सहाय्यक अधिक्षकासह दोघांच्यावर लाच घेताना कारवाई.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापूर- सेवानिवृत्त नंतर रजा रोखीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्या साठी लाच मागणारया 1).मारुती परशुराम वरुटे (वय 50).2).विलास जीवनराव शिंदे (वय 57).शिवम विलास शिंदे (वय 22).या तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेऊन कारवाई केली




या बाबत सविस्तर माहिती अशी की ,तक्रारदार यांचे सेवानिवृत्ती नंतरच्या रजा रोखीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कोल्हापूर आरोग्य कार्यालतील सहाय्यक अभियंता यांनी तक्रारदाराकडे 30 ,000 /ची मागणी केली होती.तडजोड़ करून 25 ,000/रु देण्याचे ठरले.तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.लाचलुचपत विभागाने 29/5/23 रोजी पडताळणी करून आज 30/5/ 23रोजी सापळा लावला असता सदरची लाच त्या आरोग्य विभागाचा चालक असलेला याला लाच घेण्यास सांगितले असता चालक आणि त्याचा सहकारी या दोघांनी लाच घेताना लाचलुचपतच्या पथकांनी त्याना रंगेहाथ पकडून वरिल तिघांना अटक केली.ही कारवाई श्री.सरदार नाळे पो.उपअधिक्षक ,कोल्हापुर.पो.हेकॉ.विकास माने ,सुनील घोसाळकर ,रुपेश माने,मयूर देसाई.आदीनी भाग घेतला.ही कारवाई मा.श्री.अमोल तांबे (पो.अधिक्षक लाचलुचपत ,पुणे).    मा.श्री.विजय चौधरी,(अप्पर पो.अधीक्षक, पुणे). यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आली.

Post a Comment

Previous Post Next Post