क्रस्ना डायग्नोस्टिकच्या अत्याधुनिक टेली रेडिओलॉजी हब` ला एनएबीएच चे प्रमाणपत्र


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  क्रन्सा डायग्नोस्टिकच्या पुणे स्थित अत्याधुनिक `टेली रेडिओलॉजी हब` ला केंद्र शासनाच्या नॅशनल अॅक्रिडिएशनमुळे बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचे (एनएबीएच) प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. `टेली रेडिओलॉजी हब` ला `एनएबीएच`चे प्रमाणपत्र मिळवणारी `क्रस्ना` ही भारतातील पहिली डायग्नोस्टिक कंपनी ठरली आहे.  केंद्र शासनाची एनएबीएच ही संस्था आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण सेवांसा्ठी रूग्णालये व आरोग्य सेवेतील संस्थांना अॅक्रिडिएशन प्रदान करते. त्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार टेली रेडिओलॉजी हबमध्ये आवश्यक त्या सर्व गुणवत्ता प्रक्रियांच्या माध्यमातून तपासण्या व अचूक रिपोर्टस् बनवले जातात. 


रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, टेली रेडिओलॉजी तसेच कॅन्सरशी संबंधीत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारच्या रोगनिदान चाचण्या सामान्य रूग्णांना आवाक्यातील किंमतीमध्ये उपलब्ध करून देणारी डायग्नोस्टिक कंपनी म्हणून क्रस्ना डायग्नोस्टिकची देशभर ओळख आहे. *क्रन्सा डायग्नोस्टिक विविध राज्य सरकारे तसेच महानगरपालिका यांच्याशी संबंधित पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणारी एक अग्रणी कंपनी आहे. पीपीपी स्वरूपात देशभरात १७ राज्यांमध्ये तीन हजारांहून अधिक केंद्रांसह  कार्यरत असलेली `क्रस्ना`ही काम करणारी एकमेव कंपनी आहे. आपल्या रोगनिदान केंद्र व सेवांना सर्वांधिक  संख्येने एनएबीएचचे अॅक्रिडिएशन मिळवणारी `क्रस्ना` देशातील एकमेव व पहिली कंपनी आहे. ही गोष्ट क्रस्ना डायग्नोस्टिकची गुणवत्तापूर्ण कामगिरी दर्शवते. 

देशभरातील विविध राज्यांमधील क्रस्नाच्या केंद्रांमधून रूग्णांच्या केल्या जाणाऱ्या सीटीस्कॅन, एमआरआय, एक्सरे चाचण्यांचे अचूक रिपोर्टस् पुणे स्थित अत्याधुनिक `टेली रेडिओलॉजी हब` च्या माध्यमातून सुमारे दोनशे हून अधिक रेडिऑलॉजिस्ट अगदी काही तासांमध्ये अभ्यास करून त्याचे संबंधीत रूग्णांना उपलब्ध करून देतात. अशा प्रकारे `टेली रेडिओलॉजी हब` च्या माध्यमातून सेवा देणारी ही `क्रस्ना डायग्नोस्टिक ही एकमेव कंपनी आहे.

`क्रस्ना` तर्फे देशभरातील केंद्रांमधून प्रत्येक दिवसाला ५ हजारांहून अधिक व महिन्याला १ लाख ५० हजारांहून अधिक सीटीएमआर केले जातात तर प्रत्येक दिवसाला २० हजारांहून अधिक व महिन्याला ५ लाखांहून अधिक क्ष किरण (एक्स रे) केले जातात. एवढ्या मोठ्या संख्येने होणाऱ्या रोगनिदान चाचण्यांचे रिपोर्टस् अवघ्या काही तासांत या अत्याधुनिक या `टेली रेडिओलॉजी हब` च्या माध्यमातून होतात.

सामान्य रूग्णांना अगदी आवाक्यातील किंमतींमध्ये रोगनिदान चाचण्या उपलब्ध करून देण्याच्या आमचे प्रारंभापासूनचे ध्येय आहे. रोगनिदान क्षेत्र व रूग्ण सेवेमध्ये आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना या एनएबीएच्या या अॅक्रिडिएशनमुळे अधिक बळ मिळाले आहे. `टेली रेडिओलॉजी हब` च्या गुणवत्तापूर्ण व तत्पर सेवेला एक प्रकारे दुजोरा मिळाला आहे, याचा `क्रस्ना`च्या संपूर्ण टीमला मोठा आनंद आहे.

- राजेंद्र मुथा

अध्यक्ष, क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड, पुणे

..

Post a Comment

Previous Post Next Post