रामदेव बाबा महाराज यांच्या शिरोली नजीकच्या मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्य विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले

जल आणि दुग्धाभिषेकानंतर होम हवन विधी पार पडला. दिवसभरातील या धार्मिक विधींचा  भक्तांनी लाभ घेतला.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 देशभरात असंख्य मंदिर आणि भक्तगण लाभलेल्या रामदेव बाबा महाराज यांच्या शिरोली नजीकच्या मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्य विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले . तीन दिवशीय उत्सवादरम्यान आज सकाळी पवित्र गंगाजल घेतलेल्या १०८ कुमारीका आणि हजारो भक्त गणांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीन बाबा रामदेव यांच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. जल आणि दुग्धाभिषेकानंतर होम हवन विधी पार पडला. दिवसभरातील या धार्मिक विधींचा  भक्तांनी लाभ घेतला.

   - राजस्थान राज्यातील भारत - पाकिस्तान सीमेवरील पोखरण नजीकच्या रामदेवरा (रणुजा) येथील राजे अजमलजी यांचे वंशज असलेले रामदेव बाबा महाराज यांनी हजारो भक्तांच कल्याण केल. त्यांना पूजणारा मोठा भक्तगण आहे. राजस्थानी बारा बलुतेदार समाजाच आदराच स्थान असलेले श्री. रामदेवबाबा यांच कोल्हापूर - सांगली रोडवरील शिरोली फाटा इथल्या मंदिराचा जिर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि शोभायात्रा अशा धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलय. श्री. रामदेव सेवा समिती मंडळाच्या वतीन शुक्रवारपासून मंदिर आणि परिसरात धार्मिक उत्सवाला प्रारंभ झाला. या निमित्तान त्याचं जागेवरच नवीन मार्बलच आकर्षक मंदिर उभारण्यात आल य शुक्रवारी होम हवन याचे विविध धार्मिक विधी संपन्न झाले आज सकाळपासूनच मंदिर आणि परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती पंचांगेचा पवित्र जल कलशामध्ये भरून बारा बलुतेदार समाजातील १०८ कुमारीका शिरोली फाटा इथून मिरवणुकीत सहभागी झाल्या. ढोल ताशांच्या गजरात, बँडच्या तालावर नृत्याचा आनंद घेत ही मिरवणूक मंदिराकड निघाली. विविध रथात गणपती, सरस्वती, श्रीकृष्ण, लक्ष्मी, भगवान शंकर तसंच श्री रामदेव बाबा यांच्या अश्वारूढ मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. भाविकांच्या सहभागातून ही मिरवणूक मंदिरात आली. भगवान रामदेव बाबा यांच्या सह विविध मुर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. दूध आणि पवित्र गंगा जल अभिषेकानंतर होम हवन संपन्न झाल. भाविकांनी या सर्वच विधींचा आणि दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी मोहब्बत सिंग देवल, माजी नगरसेवक ईश्वर परमार, रमेश पुरोहित, मक्खन सिंग देवडा, गुमानसिंग देवडा, शांतीलाल पुरोहित, हिरालाल पुरोहित यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post