रोटरी चे ‘व्यावसायिक गुणवत्ता व रोटरी गौरव पुरस्कार’ प्रदान



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स,  तर्फे २०२३ या वर्षासाठीचे ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ (व्होकेशनल एक्सलेन्स अवॉर्ड ) व रोटरी गौरव पुरस्कार २० मे रोजी न्यू कॉलेज कोल्हापूर येथील सभागृहाती प्रदान करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहाय्यक प्रांतपाल रो. सुजाता लोहिया व प्रांतपालांचे विशेष प्रतिनिधी रो वारणा वडगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान  करण्यात आले. रो सुजाता लोहिया यांनी रोटरीची सविस्तर माहिती दिली व सर्व गौरवमूर्ती हे असामान्य असल्याचे सांगितले. 

प्रमुख पाहुण्या रो वारणा वडगावकर म्हणाल्या की, आपापल्या परीने सामाजिक कार्य करणाऱ्या समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचणे व त्यांचे काम समाजापर्यंत पोहोचवणे, हे रोटरीचे काम असल्याचे सांगितले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या अध्यक्षा रो सविता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व अशा पुरस्कारांमुळे सामान्य कार्यकर्त्यांना अधिक बळ येतं असे सांगितले. 

या वेळी रोटेरियन्स, सत्कारमूर्ती व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

पुरस्कार विजेते खालील प्रमाणे -

डॉ लता पाटील (शैक्षणिक क्षेत्र), अनिता काळे (सामाजिक कार्य), मंगला जाधव (धुणी भांडी), शिवाजी आळवणे (शेतकरी), सौम्या तिरोडकर(विमा सल्लागार ), डॉ शशिकांत कुंभार (आयुर्वेदाचार्य), डॉ. सुषमा सिद (आयुर्वेदाचार्य) , अजम जमादार (मंडप व्यवसाय), ओंकार नवळीहळकर (आपत्ती व्यवस्थापन), चिदंबर शिंदे (ग्राफिक डिझाईनर), डॉ मनाली बाफना (ॲलोपॅथी डॉक्टर), दिपक बिडकर (नृत्य विशारद), अभिलाषा नाईक (व्यावसायिक शिक्षण) तसेच याप्रसंगी रोटरी गौरव पुरस्कार -  कु वेदिका जाधव (स्पोर्टस), कु श्रेया देसाई (मुलांचा लैंगिक छळ विरोधी संघटना ' सक्षम'), व श्री दिपक जाधव (सामाजिक कार्य) यांना तर नेशन बिल्डर अवॉर्ड श्री हारकानाथ भोसले (विद्यामंदिर हुपरी), सौ सुजाता पाटील (प्रबुद्ध भारत हायस्कूल) व श्री अशोक चौगुले(न्यू कॉलेज) यांना वितरित करण्यात आले. तसेच श्री. मनोज गुणे, श्री. विनय कौलवकर, श्री. पंकज इंगळे, सौ.गार्गी दाभाडे , सौ.सोनाली चिपाडे व कु. तत्त्व लुनिया यांना फ्रेंड ऑफ रोटरी पुरस्कार देण्यात आला.

याप्रसंगी दिपक पाटील, सुरेश केसरकर, श्रेया देसाई, अनिता काळे, ओंकार नवलीहळकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरॅक्टर कॅनीस नोरेन्ज यांनी केले. रो मनीषा राठोड यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post