सासरच्या कडून स्वताच्या सुनेच्या वडिलांना व भावाला अपमानित करून मारहाण

 सासरे मुश्ताक अजीज शेख, पती गुलाम जीलानी शेख , मोठे दीर गौस शेख , लहान दिर कादिर शेख , आणि सासू सबरुननिसा यांना अटक


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे :  पुणे लष़कर परिसरातील परशिएन हेअर  सलून  व्यवसायिक मुश्ताक अजीज शेख व त्याच्या मुलांनी लग्नाच्या निमंत्रण देण्यासाठी आलेल्या स्वतःच्या सुनेच्या वडिलांना व भावाला अपमानित करून मारहाण केली, तसेच सुनेला सासरच्या  कडून  अगदी कपडे पहाटेपर्यंत लज्जास्पद पणें मारहाण करण्यात आली, पतीने आणि दोन्ही दिरांनी  देखील  मारहाण केली  आलेल्या सुनेच्या वडीलांना व भावाला जबर मारहाण करून जखमी केले. 

अफरोज गुलाम जीलानी शेख वय 30 या पीडित महिलेने पोलिसांना लेखी तक्रार नोंदवली आहे,तसेच पीडित महिला म्हणाली लग्न झाल्यापासून नेहमी मानसिक व शारिरीक त्रास होत होता माहेरून पैसे घेऊन ये असं वारंवार माझी सासू, सासरे,जेठ व दीर यांच्या कडून मागणी होत असे, घाणेरड्या शिव्या दिल्या जात होत्या,त्यामुळे माझी तब्यत देखील खराब झाली होती आणि हल्ली सतत मारहाण करण्यात येत होती,माझे वडील माझ्या भावाच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन निमंत्रण देण्यासाठी आल्यावर माझे पती आणि सासरे  व दोन्ही दीर यांनी मिळून मला व माझ्या वडलांना,भावाला जबर मारहाण करून घरातून अपमान करून हाकलून दिले अशी माहिती घाबरलेल्या अफरोज गुलाम जीलानी शेख या पीडिताने पोलिसांना दिली आहे,

 पोलिसांनी  सासरे मुश्ताक अजीज शेख,पती गुलाम जीलानी शेख,मोठे दीर गौस शेख,लहान दिर कादिर शेख,आणि सासू सबरुननिसा यांना अटक केली आहे . या बाबतचा पुढील तपास कोंढवा  पोलीस करत आहे

Post a Comment

Previous Post Next Post