संपूर्ण राज्यातील 'ड' वर्ग महानगरपालिकांमध्ये इचलकरंजी महानगरपालिका अव्वल

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी: प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासन महानगरपालिका प्रशासनाने विविध कामकाजाबाबत विविध योजना, प्रशासन व्यवस्था व उत्पन्न वाढ यासोबत केलेल्या विविध कामांच्या मुल्यांकनामध्ये संपूर्ण राज्यात इचलकरंजी महानगरपालिकेने 'ड' वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये  प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. २० एप्रिल नगर विकास दिनाचे औचित्य साधून एन.सी.पी.ए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डाॅ. सुनिलदत्त संगेवार, जलअभियंता  सुभाष देशपांडे व अभियंता अभय शिरोलीकर उपस्थित होते. 

 महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांचे ५ गटात विभाजन करुन मुल्यांकन केले असून 'ड' वर्ग महानगरपालिकांच्या गटात प्रथम क्रमांक इचलकरंजी, द्वितीय मिरा भाईंदर तर तृतिय क्रमांक कोल्हापुर महानगरपालिकेस प्राप्त झाला आहे.

शहराच्या नावलौकिकासाठी सहभाग घेतलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, शहरातील सर्व नागरिक यांच्या सहभागामुळे व सकारात्मक प्रतिसादामुळेच प्रशासनाला सदरचे यश प्राप्त करता आले ,अशी प्रतिक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post