पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला



प्रेस मीडिया लाईव्ह : 

सुनील पाटील :

 नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडतोय. जवळपास ४०० एकरचे हे मैदान श्री सदस्यांच्या गर्दीने भरलेला दिसून येत आहे.पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या इतर मंत्री आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. जवळपास २० लाखांहून अधिक श्रीसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय.

खारघरमध्ये भव्यदिव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यासाठी श्रीसदस्यांची अफाट गर्दी सोहळ्याच्या ठिकाणी दिसून येतं आहे. बघावं तिकडे श्रीसदस्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून याची याची देही याची डोळा सोहळा पाहिला आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य गीताने या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीरामाची प्रतिमा देऊन अमित शाह यांचं स्वागत करण्यात आले.

तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अमित शाह यांना राष्ट्रध्वज आणि वाघाची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यानंतर श्री सदस्यांच्या पाच प्रतिनिधींनी देखील अमित शाह यांचं शाल-श्रीफळ देऊन स्वागत केलं. यावेळी श्री सदस्यांकडूनही छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती अमित शाहांना भेट देण्यात आली. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाजकार्यावर आधारित एक ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली.

त्यानंतर ज्या सोहळ्यासाठी राज्यभरातून नागरिक खारघरच्या मैदानावर जमा झाले तो पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २५ लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. तसंच सर्व श्री सदस्यांच्या वतीने तब्बल १० फूटांचा भव्य असा गुलाबाचा हार घालून पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारींचा सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post