10 हजाराची लाच स्विकारताना जयसिंपुर पो लिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सोमनाथ देवराम चळचुक यांच्यावर कारवाई

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे 

      कोल्हापूर :  विकलेली गाडी परत मिळवुन देण्यासाठी 10 हजाराची लाच स्विकारताना जयसिंपुर पो लिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सोमनाथ देवराम चळचुक यांच्यावर कारवाई करून  ताब्यात घेतले.


या बाबतची सविस्तर माहिती अशी की ,तक्रारदार यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात ओमनी कार परत मिळवण्यासाठी अर्ज केला होता.ती परत देण्यासाठी सहाय्यक फौजदार सोमनाथ देवराम चळचुक (वय 48वर्षे).रा महादेव कोळी 16.नं.गल्ली विजयमाला जयसिंगपूर .मुळ गाव बाडगी ता.पेठ जि.नाशिक याने तक्रारदाराकडे 15,000/ ची लाच मागितली होती .तड़जोडी नंतर 10 ,000/ रु.देण्याचे ठरले.तक्रारदाराने लाचलुचपत       विभागाकडे तक्रार केली होती.त्याची पडताळणी करुन आज 20/04/2023 रोजी सापळा लावुन 10 ,000/ची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई श्री.सरदार नाळे पो.उउपअधीक्षक,संजीव बंबरगेकर ,प्रकाश भंडारे ,विकास माने आदीनी सहभाग घेतला.ही कारवाई पोलिस अधीक्षक लाप्रवि    पुणेचे मा.श्री.अमोल तांबे ,अप्पर पोलिस अधीक्षक मा.श्री.सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post