जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन कोल्हापूर चाप्टर या संघटने मार्फत कोल्हापूर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर शहरात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन कोल्हापूर चाप्टर या संघटने मार्फत कोल्हापूर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दिनांक ०२/०४/२०२३ रोजी पहाटे ०५.०० वा.पासुन ते स्पर्धा संपेपर्यंत करणेत आले आहे.

मॅरेथॉन मार्गावरील पोलीस ग्राउंड ते धैर्यप्रसाद चौक- लाईन बाजार धैर्यप्रसाद चौक शहरात-  कावळा नाका ते परत पोलीस ग्राउंड या मार्गावर स्पर्धे दरम्यान धावणा-या स्पर्धकांचे सुरक्षिततेसाठी आणि महीला व लहान मुले यांची व नागरीकांची गैरसोय होवु नये, वाहतुकीची कोंडी होवु नये. सामान्य जनतेस नियमित व्यवहार पार पाडण्यास अडसर निर्माण होवु नये या करीता मा.पोलीस अधीक्षक सोो यांनी सदर मार्गावरील वाहतुक खालील प्रमाणे तात्पुरती बंद व पर्यायी मार्गाने वळविणे बाबतचे निर्देश दिलेले आहेत. तरी सदर वाहतुक नियोजनास मोटार वाहन चालक, नागरीक यांनी सहकार्य करावे.

अ) मोटार वाहतुकीसाठी प्रवेश बंद केलेला व एकेरी तसेच पर्यायी दिलेला मार्ग :-

१).. पितळी गणपती चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय चौक पर्यंतचा हा पितळी गणपती चौक व पोलीस अधीक्षक कार्यालय चौक येथे बंद करणेत येणार आहे. पितळी गणपती चौकाकडुन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणारी वाहने पोस्ट ऑफिस मार्गे पुढे सोईनुसार मार्गस्थ होतील

२) पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते पितळी गणपती चौक ते धैर्यप्रसाद चौक हा मार्ग पोलीस अधीक्षक कार्यालय,पितळी गणपती व धैर्यप्रसाद चौक येथुन वाहतुकी साठी सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे.

३) लाईन बाजार ते सर्कीट हाऊस ते धैर्यप्रसाद चौक मार्गे ताराराणी चौकाकडे जाणारे सर्व वाहनांना लाईनबाजार, सर्कीट हाऊस व धैर्यप्रसाद चौक येथे सर्व वाहनांचे वाहतुकी करीता बंद करण्यात येत आहे.

४) सदर बाजार कडुन निंबाळकर चौकात येणारे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने लिशा चौक मार्गे पुढे मार्गस्त होतील

५) सदर बाजार कडुन गोल्ड जिम चौकाकडे येणारा मार्ग आवश्यकते प्रमाणे चालू बंद करण्यात येईल.

ब) एक बाजु सुरु असलेले मार्ग :-

१) पितळी गणपती चौक ते धैर्यप्रसाद चौक ते ताराराणी पुतळा चौक दरम्यान प्रवास करणारी वाहने पितळी ताराराणी

चौक ते धैर्यप्रसाद चौक ते पितळी गणपती चौक असे एकेरी मार्गावरुनच मार्गस्थ होतील.

क) आवश्यकते प्रमाणे बंद- सुरु करणेत येणारे मार्ग :-

१) सदर बाजार चौक येथील वाहतुक आवश्यकतेनुसार चालु व बंद करणेत येईल.

२) सदर बाजार ते गोल्ड जिम कडे येणारी वाहतुक आवश्यकतेनुसार चालु व बंद करणेत येईल.

पार्कंग बाबत...

स्पर्धे करीता आलेल्या संयोजकांनी, स्पर्धकांनी आपली वाहने पोलीस उदयान समोरील खुल्या जागेत व रमण मळा

येथील खुल्या जागेत, पार्क करावीत.

वरील निर्देश हे दिनांक ०२/०४/२०२३ रोजी सकाळी ०५.०० ते स्पर्धा संपेपर्यंत देण्यात येत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post