खोपोलीजवळ २०० फूट दरीत बस कोसळली, 12 जणांचा मृत्यू; २९ जखमी


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 लोणावळा ते खोपोली दरम्यान जुन्या बोर घाटात एक बस दरीत कोसळली त्यात ४१ ते ४२ प्रवासी होते त्यापैकी २९ लोकांना वाचवण्यात आले असून काही प्रवाशांना दुखापत झाली आहे तर काही प्रवाशांना अतिगंभीर दुखापत झाली आहे व १२ ते १३ प्रवासी हे मृत पावले आहेत.



घाटात सदर ठिकाणी रस्त्याचा उतार तीव्र असल्याकारणाने हा अपघात झाला असे प्राथमिक निदर्शनास येते. सदर घाटात अवजड वाहनांना बंदी असून सुद्धा अवजड वाहने खाली उतरतात. ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे सुरक्षा कठडा नसला कारणाने हा अपघात झालेला आहे.

जर सदर ठिकाणी सुरक्षा कठडा असला असता तर सदर बस कदाचीत खाली दरीत कोसळली नसती व आज लोकांचे प्राण वाचले असते असे आम आदमी पार्टी कर्जत विधानसभा प्रभारी डॉ रियाज पठाण यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post