पिचकारीमुक्त दवाखान्यासाठी इनाम सरसावले !



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी : 

इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे रुपडे पालटत आहे.दवाखान्यात बरीच सुधारणा होत असून रुग्णालयाचे नूतनीकरण व रंगरंगोटी सुरू आहे.सदर रुग्णालय ३०० बेडचे झाल्याने रुग्णालयात वर्दळही वाढत आहे.रुग्णालयाच्या आवारात व भिंतीवर गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारण्याचे प्रमाण वाढत असून याबाबत रुग्णालय प्रशासन काळजी घेत आहे.

.

सध्या महाराष्ट्र शासनाचा सुंदर माझा दवाखाना हा उपक्रम सुरू असून त्याअंतर्गत रुग्णालय परिसरात सामाजिक संस्थांची मदत घेऊन विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या इचलकरंजी नागरिक मंचने पिचकारीमुक्त आयजीएमसाठी पुढाकार घेतला असून याबाबत संदेश देणारे विविध फलक आज आयजीएम प्रशासनास सुपूर्द करण्यात आले. सदर फलक इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नंदकुमार बनगे,डॉ महेश महाडिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी उमेश पाटील, अमित बियाणी,संजय डाके,विद्यासागर चराटे, संजय गुगळे,अमृत पारख, डॉ सुप्रिया माने,मीना कासार,कल्पना माळी,अभिजित पटवा उपस्थित होते.यावेळी डॉ नंदकुमार बनगे यांनी इचलकरंजी नागरिक मंचने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.इनामने आवश्यकता भासल्यास आणखी फलक देण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post