डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

   कोल्हापूर -कोल्हापूर शहरा सह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली.संयुक्त सिध्दार्थ नगर येथील जंयती उत्सव समिती तर्फे सकाळी बुध्द वंदना घेऊन झेंडा वंदन विशाल लोंढ़ेसो ,आणि लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक कटकधोंड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले

त्यानंतर दुपारी जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीचे उदघाटन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते प्रारंभ झाला ही मिरवणूक सीपिआर ,दसराचौक ,बिंदु चौक ,मिरजकर तिकटी ,बिनखांबी गणेश मंदीर ,भाऊसिंगजी मार्गे सिध्दार्थ नगरात सांगता झाली.या मिरवणूकीत फुलांनी सजलेल्या ट्रॉलीत भगवान गौतम बुध्द आणि विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सहभागी होते.या मिरवणूकीत नागरिक,युवक युवती ,महीला निळे  ध्वज ,निळे फेटे ,शुभ्र वस्त्रे परिधान करून सामील झाले होते.या मिरवणूकीत नितीन हळदिकर ,स्वाती काळे , सुशील कोल्ह्टकर ,जय पटकारे ,सुरक्षा सोहनी यांच्यासह विवीध बचत गट,सामील होते.तसेच कोल्हापुरातील इतर भागातुन ही मोठ्या प्रमाणात उत्साही मिरवणूका निघाल्या होत्या. रजनीकांत सरनाईक यांनी विशेष परीश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post