पनवेल परिसरात हजारो श्री सदस्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

 


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

 थोर निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. नाना साहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी निमित्त दिनांक १ मार्च रोजी पद्मभूषण स्वच्छ्ता दुत आप्पा साहेब धर्माधिकारी आणि सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र भर स्वचछता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने पनवेल शहरात देखील श्री सदस्यांनी उपजिल्हा रुग्णालय, उड्डाणपुल, तलाव क्षेत्र, शहरातील सर्व रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत. या मोहिमेत पनवेल, मार्केट परिसर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील साधारण 4 हजार 193 श्री सदस्यांनी स्वचछता मोहिमेत सहभाग घेतला होता.

    1 मार्च  2023 रोजी ति. डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमीत्त  महास्वच्छता अभियान आयोजित  केलेले आहे .स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेसाठी जनजागृती निर्माण करण्याकरिता डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नविन पनवेल शहर, रेल्वेस्थानक परिसरात बुधवार दि.1मार्च रोजी सकाळपासून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी शेकडे टन कचरा जमा करण्यात आला. या स्वच्छता अभियानाला लागणारे संपूर्ण साहित्य डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याकडून देण्यात आले. या स्वछता मोहिमेचे पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी विशेष कौतुक करत या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post