अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल

या दोन्ही मतदारसंघात कोण विजयी होणार, याबाबत प्रत्येकाला उत्सूकता लागून राहिली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल (आज) गुरुवारी जाहीर होणार आहे. चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री,नेते प्रचारात उतरवले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली होती.  त्या मुळे या दोन्ही मतदारसंघात कोण विजयी होणार, याबाबत प्रत्येकाला उत्सूकता लागून राहिली आहे.तसेच सर्वपक्षीय नेत्यांसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. निकालामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाचे गोदाम तसेच शहरातील मध्यभागात पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात येणार आहे .

अन्न धान्य महामंडळाचे गोदाम आणि मध्यभागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, कासेवाडी भागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासह संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत.

मतमोजणी केंद्र परिसरात सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार, कर्णिक यांनी बुधवारी (ता. १) पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात वेळेत पोचता यावे. तसेच कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात देखील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post