महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यांच्या वतीने लाल महाल पुणे येथे फाल्गुन कृ तृतीया या तिथी प्रमाणे महिला शिवजयंती उत्साहात साजरी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यांच्या वतीने लाल महाल पुणे येथे फाल्गुन कृ तृतीया या तिथी प्रमाणे महिला शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली लाल महालात तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे हे तिसरे वर्ष असून यावेळी शिवजन्माचा पाळणा शाहीर जालिंदर नाना शिंदे यांनी गायन करून शिवजयंती उत्सवास सुरुवात झाली त्यानंतर "शिवनेरीची अतूट गर्जना " हा पोवाडा सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा याचा प्रेरणादायी इतिहास जागृत केला याप्रसंगी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेती ते लाल महाल बालपणीचा जीवन प्रवासाचे सादरीकरण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 

शिवजयंती उत्सवाचे आयोजन  पुणे शहर अध्यक्षा वनिता वागासकर यांनी केले याप्रसंगी मनसे नेते राजेंद्र वागासकर उपाध्यक्ष बाळ शेडगे उपस्थित होते उसत्व यशस्वी करण्यासाठी जयश्री पाथरकर अस्मिता शिंदे संगीता तिकोने  व  महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी मेहनत घेतली शिवप्रेमी नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Post a Comment

Previous Post Next Post