निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची श्री.देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध तक्रारप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेचा भंग भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. 


तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, दि.२३ फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील केलेल्या भाषणात भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा उल्लेख करून स्पष्टपणे मतदारांना म्हटले की, ‘हिंदुत्वासाठी मतदान करा. कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे.’ या जोडीलाच त्यांनी श्री पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करून म्हटले की, कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांनी पुण्येश्वर महादेव मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. 

निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न श्री.देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे व त्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यावर निवडणूक आयोगानी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. Post a Comment

Previous Post Next Post