कोल्हारात दोघांच्या कडुन सव्वा तीन किलो गांजा जप्त ...



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापुरातील तोरस्करचौकातील ब्रम्हपुरी येथे एका घराच्या पत्राच्या शेड मध्ये गांजा विक्री सूरु असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलीसांना मिळाली असता तेथे रहात असलेला बंदेनवाज उर्फ बंडा सोफीश मकानदार हा पुडीतुन गांजा विक्री करताना सापडला त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कडून सव्वा किलो गांजा जप्त जप्त करण्यात आला.


त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शिरोळ तालूक्यातील दानोळी येथील पटु आण्णा धांदले हा पुरवीत असल्याचे समजल्यावरुन त्याला लक्ष्मीपुरी पोलीसांनी दानोळी येथे जाऊन ताब्यात घेऊन त्याच्या जवळील दोन किलो गांजा जप्त करून असा एकूण सव्वा तीन किलो वजनाचा गांजा जप्त करून त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

अधीक तपास सुरु आहे.ही कारवाई लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.कटकधोंडसो ,उपनिरीक्षक श्री .महातसो ,संजय कोळी ,सुहास पाटील ,गजानन परीट,आदीनी भाग घेउन कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post