मनुवाद्यांचे संविधान रोखायचे असेल तर वंचित पक्ष नेतृत्वाखाली लढले पाहिजे

वंचितच्या जिल्हा प्रभारी डॉ. क्रांतीताई सावंत यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर /प्रतिनिधी:

 कोल्हापूर जिल्ह्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने देशाला नेतृत्व दिले. आंबेडकरी विचारांची सत्ता आणावयाची असेल तर बाळासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे योगदान मोठे असायला हवे. बाळासाहेब हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताच्या वारसा बरोबरच वैचारिक वारसदारही आहेत. मनुवाद्यांचे संविधान रोखायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी या एकाच पक्ष नेतृत्वाखाली आपण लढले पाहिजे. समाज चळवळ आणि राजकारण तळागाळापर्यंत नेले पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन वंचितच्या जिल्हा प्रभारी डॉ. क्रांतीताई सावंत यांनी केले.

   वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडी, कामगार आघाडी, महिला आघाडी तसेच भारिप बहुजन महासंघाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी यांच्या वतीने राज्य सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ भव्य पदयात्रा व शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या संयुक्तिक जाहीर महामेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मिलिंद पोवार होते.

  पक्ष निरीक्षक अतुल बहुले म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीसाठी एक ठोस दिशा घेऊन आपण पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून प्रत्येक गावात ग्राम शाखेबरोबरच महिला आघाडी, युवा आघाडी, कामगार आघाडी यांच्यामध्ये समन्वय साधून काम केले पाहिजे. महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी सदस्य विश्वजीत कांबळे यांनी लोकशाहीवर गदा येत असून वंचितचे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले. दिगंबर सकट यांनी जिल्ह्यात किमान तीन आमदार निवडून आणण्यासाठी एकत्रित काम करून, सर्वांना सोबत घेऊन तसेच समदु:खी जनतेला एकत्र करून वंचित समाज घटकांनी सत्तेमध्ये जाणे आवश्यक आहे. तसेच वंचित एक तिसरा पर्याय म्हणून जनतेसमोर यावा असे मत मांडले. युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी यांनी लोकशाही संपवण्याचे काम राजकारणी लोक करीत असून प्रस्थापितांना शह देण्यासाठी आपण वंचितच्या माध्यमातून योगदान द्यावे असे आवाहन केले. तर एल.जी. सनदी यांनी वंचित आणि शिवसेना युती भक्कम असून आपणाला आगामी काळात भरपूर काम करायचे असल्याचे स्पष्ट केले. मिलिंद पवार यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. कोल्हापूर दक्षिण वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी स्वागत केले तर महासचिव सिद्धार्थ कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय सुतार यांनी केले. तर आभार कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी मानले. कार्यकर्त्यांनीही पक्ष वाढीसंदर्भात आपल्या सूचना मांडल्या.

  यावेळी पक्षनिरीक्षक सागर कांबळे, कोल्हापूर उत्तरचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, विश्वजीत कांबळे, प्रशांत वाघमारे, जालींदर जमादार, महादेव कुंभार, प्रकाश कांबळे, सुरेश जाधव, डॉ. आकाश कांबळे, धनाजी सेनापती, मल्हार शिर्के, प्रवीण बनसोडे, महादेव कांबळे, नितीन कांबळे, अशपाक देसाई, संदीप कांबळे, अमित नागटीळे, कृष्णात कांबळे, पुंडलिक कांबळे, वैशाली कांबळे, वंदना पवार, आम्रपाली गायकवाड, फरजाना नदाफ यांच्यासह वंचितच्या विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


- विलास कांबळे

कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष (उ)

- संजय सुतार.

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख

वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर (उ)

Post a Comment

Previous Post Next Post