युवा शेतकऱ्याचा विद्युत शॉक लागून मृत्यू

चतारी परिसरातील घटना , आकस्मिक मृत्यूची नोंद.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 राहुल सोनोने  : मळसुर  : 

मळसुर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चतारी येथील युवा शेतकऱ्याचा  विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.२७ फेब्रुवारी रोजीच्या सकाळी ११ : ३० वाजताच्या सुमारास घडली, मंगेश फाळके ३२ असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक शेतकरी फाळके यांनी शेतात गव्हू पिकांची पेरणी केली होती.

 कॅनॉलच्या पाटसाऱ्यातून कृषी मोटर पंप लावून गव्हू पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत वायर जोडताना जबर शॉक लागून कॅनॉलच्या पाण्यात पडल्याने जागेवरच मृत्यू झाला,सदर घटनेची माहिती पोलीस पाटील विजय सरदार यांनी पोलिसांना दिली, ठाणेदार योगेश वाघमारे, बीट जमादार सुधाकर करवते, योगेश डाबेराव,गोपाल पोटे, हर्षल बावणे, यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार भगवान शिंदे करीत आहे.

 मृतदेह उत्तरीय तपासण्यासाठी नेण्यास नकार 

गावात खाजगी वाहन उपलब्ध असूनही काही वाहन चालक मालक यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यास नकार दिला होता, अखेर काही तासांनंतर एका खाजगी वाहनात मृतदेह पाठविण्यात आले, वाहन मालकांनी मृतदेह नेण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांकडून संतप्त व्यक्त करण्यात आला,

Post a Comment

Previous Post Next Post