अर्ज करुनही मुदतीत प्रमाणपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना



प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून पदवी प्रमाणपत्रे वेळेत मिळत नसल्याची तक्रारी विद्यार्थ्यांकडून होत आहे. छपाईसाठी कागद नसल्याने प्रमाणपत्रास विलंब असल्याची उत्तरे परीक्षा विभागाकडून दिली जात आहेत,  त्यामुळे अर्ज करुनही मुदतीत प्रमाणपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, विद्यापीठाकडून येत्या सोमवारपासून सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

परदेशातील विद्यापीठातील प्रवेश आणि अन्य कारणांमुळे पदवी प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. काही कर्मचाऱ्यांनी छपाईसाठी कागद नसल्याने प्रमाणपत्र देण्यास अडचणी असल्याचे सांगितले. हे सर्व उत्तर ऐकून विद्यार्थी हवालदील झाले आहेत. वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्यास पुढच्या शैक्षणिक भवितव्यावर त्याचा परिणाम होणार आहे, याची चिंता विद्यार्थी-पालकांना आहे. माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत परीक्षा विभागाच्या कार्यपद्धतीवर तोशेरे ओढले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post