इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम - 48 तासात निष्कसित करण्याची बाबासाहेब नलगे यांना नोटीस..

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम-  48 तासात निष्कसित करण्याची बाबासाहेब नलगे यांना नोटीस देण्यात आली आहे. 
प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार अनधिकृत बांधकाम केलेले स्वतः निष्कसित  केलेले नाही तसेच सदर जागेवर चालू असलेला वापर थांबविणेत आलेला नाही त्यामुळे बाबासाहेब जयसिंग नलगे रा.सि.स.नं.21165,स्टेशन रोड डेक्कन मिल समोर इचलकरंजी यांना इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सदर जागेवरील अनधिकृत बांधकाम - नोटीस मिळालेल्या पासून 48 तासाचे आत स्वतःहून निष्कसित करावे अन्यथा इचलकरंजी महानगरपालिके कडुन आपले जागेवरील अनधिकृत बांधकाम निष्कसित करण्यात येईल व कार्यवाहीची जबाबदारी व त्यासाठी येणारा संपूर्ण खर्च आपलेवर राहिल याबाबतची नोटीस देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post