मराठी राजभाषा दिन हा वाचन चळवळ विकसित करण्याचा दिवस

 जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांचे मत


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी ता.२७ कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन अर्थात मराठी राज्यभाषा दिन हा मराठी भाषा ,साहित्य आणि संस्कृती या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे .या दिनी कुसुमाग्रज यांना अभिवादन करत असतानाच आपण मराठी वाचन चळवळही विकसित केली पाहिजे. त्यासाठी व्यक्तिगत ग्रंथ संग्रहाबरोबरच नागरिकांनी सार्वजनिक ग्रंथालयांचे सभासदही झाले पाहिजे. तसेच घरातील मुला मुलींना, विद्यार्थी वर्गाला  वाचनाची गोडी लागेल याकडेही लक्ष दिले पाहिजे ,असे मत कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती अपर्णा वाईकर यांनी व्यक्त केले. 

त्या समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयात कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिन अर्थात मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात बोलत होत्या. प्रारंभी श्रीमती वाईकर व प्रा.डॉ. अविनाश सप्रे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रंथालय अधिकारी उत्तमराव कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अन्वर पटेल यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.यावेळी प्रा.डॉ. एफ.एम.पटेल, प्रा. डॉ.प्रतिमा सप्रे,पाटलोबा पाटील, सौदामिनी कुलकर्णी नंदा हालभावी ,अश्विनी कोळी,पांडुरंग पिसे,बाबासाहेब बोडके,जीवन पाटील,संदेश जाधव,तुकाराम शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post