कसबा जिंकण्याचा महाविकास आघाडी नेत्यांचा निर्धार

 भाजपविरोधी मतांची एकजूट आघाडीला विजयी करणार : रवींद्र धंगेकर

भाजपने कसबा प्रगतीपासून वंचित ठेवला : संजय मोरे

राज्यातील विजयाचा फायदा कसब्यातही मिळणार : बाळासाहेब दाभेकर


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : उमेदवार कोणीही असला तरी कसबा जिंकण्याचा निर्धार महाविकास आघाडी नेत्यांनी आज जाहीर केला, त्यामुळे  मंडई विद्यापीठ कटट्यावर महा विकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन घडले २५१ व्या मंडई विद्यापीठ कट्टयावर कसबा मतदार संघातील संभाव्य इच्छूक उमेदवार आणि मतदारसंघातील मान्यवर नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात रवींद्र धंगेकर( कॉंग्रेस ), बाळासाहेब दाभेकर ( कॉंग्रेस ), शहरप्रमुख संजय मोरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  ),  दत्ता सागरे ( राष्ट्रवादी काँग्रेस ), अशोक हरणावळ (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  ), प्रफुल्ल गुजर( वंचित बहुजन आघाडी ) या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.कमल स्मृती हाऊस शुक्रवार पेठ येथे हा २५१ वा मंडई विद्यापीठ कट्टा राजकीय मंथनामुळे गाजला.

 

 शिवसेना पुणे शहर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख तसेच मंडई विद्यापीठ कट्टयाचे संस्थापक बाळासाहेब मालुसरे यांनी स्वागत केले. सर्व नेत्यांचा महात्मा फुले मंडई छायाचित्राची आकर्षक फ्रेम, शाल देऊन सत्कार करण्यात आला.राज्यातील शिक्षक , पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर एकीचा आवाज बुलंद करत कसब्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी खेळीमेळीच्या वातावरणात प्रचलित घडामोडी आणि राजकारणावर  चर्चा केली. 

कसबा विधानसभा मतदारसंघाची जडणघडण, मागील निवडणुकांचा इतिहास, मतदानाची समीकरणे आणि स्वतःच्या पक्षाची स्थिती ,इच्छुक उमेदवार तसेच नेत्यांनी सांगितले. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला ठरला होता कारण भाजप विरोधी मते विभागली जात होती .या मतांची बेरीज केली तरी भारतीय जनता पक्ष अल्पमतात असल्याचे कोणालाही लक्षात येऊ शकते, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले .भाजपचा उमेदवार येथून उभा विजयी होत होता, कारण त्यांच्या मागे शिवसेना होती .मात्र ,भाजपने कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत ,असे संजय मोरे यांनी सांगितले .काँग्रेसचे दिग्गज नेते कसबा मतदार संघातून यापूर्वी निवडून आलेले आहेत याची आठवण बाळासाहेब दाभेकर यांनी करून दिली. तर वंचित विकास आघाडी शिवसेनेसोबत असल्याने या मतदारसंघात शिवसेना जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा राहील असे प्रफुल्ल गुजर यांनी सांगितले .

दत्ता सागरे यांनीही कसब्यातील जुन्या राजकीय घडामोडी चा इतिहास सांगत महाविकास आघाडीला हा मतदारसंघ भाजपकडून खेचून घेण्यास सुवर्णसंधी असल्याचे आवर्जून सांगितले .कसब्या मध्ये सहानुभूतीची कोणतीही लाट नसून मोदी लाट देखील संपुष्टात आली आहे, यावर या नेते मंडळींचे एकमत झाले. या खेळीमेळीच्या चर्चे चर्चेनंतर आकाशात फुगे सोडून मंडई विद्यापीठ कट्ट्याचा समारोप झाला .यावेळी नंदू येवले, हर्षद मालुसरे हे मान्यवर देखील उपस्थित होते.डॉ. दीपक बीडकर यांनी आभार मानले.


Post a Comment

Previous Post Next Post