वकील महिलेवर हल्ला माजी नगरसेवका विरोधात कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा.

तात्काळ उचित कार्यवाही करुन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी.  डॉ. गोऱ्हे


प्रेस मीडिया लाईव्ह :

पूणे: दि. १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी  एका वकील महिलेने  एक निवेदन विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना दिले आहे. यात माजी नगरसेवक व त्याच्या पत्नीसह ३०-३५ व्यक्तींनी पीडित वकील महिलेवर हल्ला केला आहे.त्याचबरोबर पोलिसांनी देखील गुन्हा नोंद करण्यासाठी सहकार्य केले नसल्याचे सदरील निवेदनात म्हंटले आहे.

याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी पत्र दिले आहे यात असे म्हंटले आहे की, पीडित वकील महिला (दि.१३) जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी ८:४५- 9 च्या सुमारास राहत्या घरुन पूना हॉस्पिटलला जायला निघाल्या होत्या. यावेळी गोखलेनगर स्थित शिवसेना कचेरी समोर एक चार चाकी गाडी पुढे चालली होती. त्या चार चाकी मध्ये बसलेला इसम रस्त्यावरून गप्पा मारत, रोड शो करत अगदी धीम्या गतीने गाडी चालवत होता व ह्या मुळे संपूर्ण रस्ता ट्रॅफिक जॅम झालेला होतं.पीडित वकील महिला ह्या इतर वाहन चालक हॉर्न वाजवू लागले, तरी सुद्धा सदरचा गाडी चालक गाडी ना लवकर चालवत, ना गाडी बाजूला घेत होता. पत्रकार नगर सोसायटी समोर ऍड चव्हाण यांना ओव्हरटेक करायला जागा मिळाली म्हणून त्या गाडीला ओव्हरटेक करत पुढे शेती महामंडळ चौकाच्या दिशेने निघून गेले व सिग्नल लाल असल्या कारणाने थांबले. 

त्या चार चाकी मध्ये असलेल्या इसमाने पीडित महिलांचा पाठलाग करत, सिग्नलला गाठले, त्या गाडी मधून एक महिला उतरली . तिने यांच्या गाडीची चावी काढून घेतली आणि त्यांना मारायला सुरुवात केली की, त्याच वेळी त्याच गाडीतून एक व्यक्ती खाली उतरला व त्याने यांच्या छातीला जोरात हाथ मारला. त्याच्या सोबत २ महिला व ३ पुरुष सुद्धा पीडित वकील महिलेला यांना मारु लागले, अश्लील भाषेत शिवीगाळ करून यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

सदरील संपूर्ण व इतर उल्लेख पीडित वकील महिलेने डॉ.गोऱ्हे यांना दिलेल्या यांनी निवेदनात केला आहे.यासंदर्भात तात्काळ उचित कार्यवाही करुन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर तक्रार घेण्यासाठी चालढकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post