पुण्यातील कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बनली अतिशय प्रतिष्ठेची

गिरीश बापट व्हिलचेअरवर बसून कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यातील कसबा आणि चिंचवडची  पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे , गिरीश बापट आजारी असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला आपण प्रचारात सहभागी होणार नाही, असं सांगितलं होतं. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते संजय काकडे यांनी काल गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर बापट यांनी आपण प्रचारात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पक्षासाठी ते आज व्हिलचेअरवर बसून कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत विशेष म्हणजे त्यानंतर आज ते प्रचारात सहभागी देखील झाले.

कसब्यात नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गिरीश बापट यांनी व्हिलचेअरवर एन्ट्री मारली. यावेळी गिरीश बापट यांची प्रकृती प्रचंड ढासळलेली दिसली. त्यांच्या बोटांमध्ये ऑक्सीमीटर होतं. तसेच ऑक्सिजनचा सिलेंडर देखील होता. देवेंद्र फडणवीसांनी बापट यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं होतं. दुसरीकडे बापट यांनी आपण कसब्याच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांचा प्रचार करणार असल्याचं म्हटलं होतं.

पुण्यात कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीची लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे. महाविकास आघाडीकडून कसब्याच्या जागेवर काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलाय. तर भाजपकडून हेमंत रासणे यांना उमेदवारी देण्यात आलीय. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी टिळक कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे कसब्यातील राजकीय घडामोडी चर्चेत आल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post