पानसरेंचे खुनी पकडकण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखवावी..स्मृती जागर सभेत मागणी.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१७ शहीद गोविंद पानसरे यांचा खून होऊन आठ वर्षे झाली.पण अजून खुनी सापडत नाहीत ही चिंतेची बाब आहे. वास्तविक गृहखात्याने व तपास यंत्रणांनी ठरवले तर हा शोध लागणे अवघड नाही.त्यामुळे पानसरे यांच्यासारख्या एका महत्त्वाच्या विचारवंत नेत्याच्या खुन्याना पकडणे ही सरकारची जबाबदारी आहे.तशी इच्छाशक्ती त्यांनी दाखवली पाहिजे असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. उदय नारकर यांनी व्यक्त केले.ते डाव्या पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने आयोजित कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती जागर सभेत बोलत होते. अध्यक्ष स्थानी माकपचे जिल्हा सचिव प्राचार्य ए.बी.पाटील होते. या सभेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे ,समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक कॉ.दत्ता माने यांनी केले.

 कॉ. सतीशचंद्र कांबळे म्हणाले , पानसरे हे दिनदलित, दुर्बल, कामगार, शेतकऱ्यांसाठी लढणारे लढवय्ये नेते होते. ते ज्यांना डाचत होते त्यांनीच त्यांचा खून केला हे उघड आहे आणि हे डाचणारे समाजातील प्रस्थापित आहेत. त्यामुळे त्यांचे खुनी न सापडणे हा देखील एक कटाचाच भाग आहे.पण आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. २० फेब्रुवारी रोजी' जवाब दो 'असे म्हणत आपण प्रचंड संख्येने मोर्चा काढणार आहोत. पानसरेंचे खुनी आणि सूत्रधारांना कधी पकडणार? हु किल्ड पानसरे? या प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी आपण कोल्हापुरातील दसरा चौकातून दुपारी अकरा वाजता प्रचंड मोर्चा काढणार आहोत. त्यामध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर काँग्रेस पानसरे आणि मी यांनी ठरवून अनेक सभा घेतलेले होत्या. 'सनातनी विकृती आणि विवेकी संस्कृती' या मी लिहिलेल्या प्रस्तावनेला पानसरेंनी प्रस्तावना लिहून ती श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रकाशित केली होती. आणि कालांतराने त्यांचाच खून झाला. पानसरे यांच्या  स्मृतीचा जागर करत असताना असताना आपण त्यांचा समग्र परिवर्तनाचा व प्रबोधनाचा विचार कसा वाढत राहील यासाठी सामूहिकपणाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे जबाब दो आंदोलन योग्य आहेच पण काही प्रश्न आपणही आपल्याला विचारण्याची गरज आहे. ती आपली नव्हे तर काळाची गरज आहे.

प्राचार्य ए.बी. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. आभार कॉम्रेड महेश लोहार यांनी मानले.या सभेला प्रा. सुभाष जाधव, आनंदराव चव्हाण, शिवाजी साळुंखे ,विवेकानंद गोडसे, दिलदार मुजावर ,राजेश वरक, भरमा कांबळे ,बजरंग लोणारी, यासिन अत्तार, सदा मलाबादे,पार्वती जाधव ,सुनील बारवाडे ,राजू गांजवे 

यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post