छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे महाराज जयंती विशेष" सप्ताहाचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 प्र. प्राचार्या सौ. आर.एल.निर्मळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले


प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप ,संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठवडगाव येथे "छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे महाराज जयंती विशेष" सप्ताहाचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन  दिनांक 20 /2/ 2023 रोजी  करण्यात आले होते. 

या मध्ये "छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु" या विषयावर बी.एड्. प्रथम वर्षातील छात्राध्यापक पारितोष हुजरे व तेजस्विनी नादवडे यांनी अगदी उत्कृष्टरित्या व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानात शिवाजी महाराज हे किती दूरदृष्टीचे राजे होते हे खूप छान पद्धतीने सांगितले. आणि त्यामुळे ते अगदी पुढचा विचार करून सर्व व्यवस्थापन करत होते , हे अगदी उदाहरणासहित आपल्या व्याख्यानात उत्कृष्टरित्या सांगितले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. आर.एल.निर्मळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी आजच्या युगात कसा दूरदृष्टीने विचार केला पाहिजे, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच संत गाडगे महाराज जयंती निमित्त महाविद्यालयामध्ये "स्वच्छता अभियान" राबविण्यात आले. त्यामध्ये सर्व छात्राध्यापकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला व महाविद्यालयीन परिसर स्वच्छ केला.अशा रीतीने अशोकराव माने बी.एड्. कॉलेज पेठ वडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज जयंती विशेष सप्ताह प्रारंभ झाला. 

या सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच इतर उपस्थितीमध्ये प्राध्यापिका शिरतोडे मॅडम, प्राध्यापक सोरटे सर, प्राध्यापिका सावंत मॅडम, प्राध्यापिका चरणकर मॅडम, ग्रंथपाल चौगुले मॅडम, द्वितीय वर्षाची वर्ग प्रतिनिधी सुप्रिया माने , प्रथम वर्षाची  वर्ग प्रतिनिधी दिव्या माने तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी,बी.एड्. प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक, छात्राध्यापिका उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post