कर्करोग तपासणी साठीची “पेट सिटी स्कॅन’ चाचणी फक्‍त पाच ते सहा हजार रुपयांत होणार

ससूनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार ..

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे – कर्करोग तपासणी साठीची “पेट सिटी स्कॅन’ चाचणी फक्‍त पाच ते सहा हजार रुपयांत होणार असून, ससूनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता तथा बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयचे प्रमुख डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

केवळ पाच-सहा हजारांत

12 प्रकारच्या चाचण्या होत असून, खासगी लॅबमध्ये याच चाचणीसाठी 15 ते 20 हजार रूपये मोजावे लागतात. अशाप्रकारची सोय असणारे, ससून राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय आहे. गाठीची तपासणी “बायोप्सी’ तंत्रज्ञानाने करतात; परंतु त्याचे निदान कर्करोगात झाल्यास तो अन्य ठिकाणी शरीरात पसरला आहे का? हे पाहण्यासाठी “पेट सिटी स्कॅन’ केले जाते. गेल्या वर्षी हाफकीनकडून पेटस्कॅन मशीन खरेदी करून ससून रुग्णालयात बसवण्यात आले होते. मात्र, ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नव्हते. आतापर्यंत येथे 59 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीचे किती दर आकारायचे याचा सरकारी निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केला आहे. रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. शेफाली पवार असून, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण नाईकनवरे आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. इब्राहिम अन्सारी याचे काम पाहत आहेत.

तपासणीसाठी नियम : 

तज्ज्ञ डॉक्‍टरांची तपासणी चिठ्ठी आवश्‍यक, ससून मधील कोणत्याही विभागाचे प्राध्यापक अथवा विभागप्रमुख ही चिठ्ठी देऊ शकतात.
रुग्ण बाहेरील डॉक्‍टरांची चिठ्ठी घेऊन आल्यास त्याला प्रथम बाह्यरुग्ण विभागात तपासणी करावी लागेल, त्यानंतर तेथून चिठ्ठी घेऊन तपासणी करता येईल. अपॉइंटमेंटनुसार तपासणी होईल.

Post a Comment

Previous Post Next Post