बर्निंग कारचा थरार ! अचानक लागलेल्या आगीत गाडी जागीच जाळून खाक ; सुदैवाने चालकाचे दैव बलवत्तर म्हणून वाचला जीवप्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

बर्निंग कारचा थरार ! अचानक लागलेल्या आगीत गाडी जागीच जाळून खाक ; सुदैवाने चालकाचे दैव बलवत्तर म्हणून वाचला जीवही घटना घडताच परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र अचानक झायलो गाडीने पेट घेतल्यामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्या लगेच बाजूला घेण्यात आल्या.

तसेच झायलो गाडीला आग लागताच जवळील व्यक्तींनी अग्निशमन दलाच्या जवानांना कळवले.

पनवेल ओएनजीसी (Panvel ONGC) आणि भिंगारी गावाजवळ (Bhigari Village) असलेल्या सीएनजी पंपाजवळ (CNG Pump) थरार उडविणारी घटना घडली आहे. पनवेल ओएनजीसी आणि भिंगारी गावाजवळील सीएनजी पंपाजवळ उभ्या असलेल्या एका झायलो गाडीने (Xylo Car) अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.

ही घटना घडताच परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र अचानक झायलो गाडीने पेट घेतल्यामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्या लगेच बाजूला घेण्यात आल्या. तसेच झायलो गाडीला आग लागताच जवळील व्यक्तींनी अग्निशमन दलाच्या जवानांना कळवले.

गाडीने अचानक पेट घेतल्याचे समजतातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी लवकर दाखल झाले होते. तसेच झायलो गाडीला भयानक आग लागल्यामुळे ही गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.झायलो गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीच्या बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ह्या आगीत झायलो गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी येऊन आग विझविण्यात यश आले असून या आगीत झायलो गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक गाडीला आग लागल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली होती. झायलो गाडीत सॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे समजले असून यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post