रायगड : पोलीस भरतीकरिता आलेल्या दोन उमेदवारांकडे सापडली औषधी द्रव्येप्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

पोलिस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या दोन उमेदवारांकडे औषधी द्रव्य सापडले. यातीच एका उमेदवाराची मैदानी चाचणी शनिवारी झाली.तर दुसऱ्या उमेदवाराची चाचणी रविवारी होणार होती. मात्र त्याची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या उमेदवाराचे रक्ताचे नमुने घेऊन मुंबई व नवी मुंबई येथील लॅबमध्ये वैद्यकीय तपासणीकता पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यावर पूढील कारवाई करण्यात येणार आहे.

अलिबाग पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास गोपनीय सूत्रांकडून वरसोली, नाईक आळी येथील एका कॉटेजमध्ये मैदानी चाचणीकरिता आलेल्या काही उमेदवारांकडे औषधी द्रव्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या कॉटेजमध्ये तिघेजण राहत होते. त्यामधील दोघेजण भरती प्रक्रियेसाठी आले होते. एक त्यांच्या सोबत आला होता. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता एक ग्रे रंगाचे पाऊच मिळून आले. दोन न्युरोकाइन्ड गोल्ड इंजेक्शन, नाव नसलेल्या औषधी द्रव्यांनी भरलेल्या काचेच्या तीन बंद बॉटल, पाच ओमेगा व्हीआयटी सीई टॅबलेटस, तीन निप्रो कंपनीच्या सिरींज सुईसह एक डिस्पोव्हॅन कंपनीची हायपोडर्मि सिरींज, डिस्पोव्हॅन कंपनीच्या सहा पॅक बंद असलेल्या ४४ डीच्या नीडल्स, एक लाल रंगाची कॅप्सुल, डिस्पोव्हॅन कंपनीच्या दोन ३२ एनच्या नीडल्स, एक बीडी यू४० इन्सुलिन असे नाव असलेली सिरींज नीडलसह त्यामध्ये औषधी द्रव्य भरलेले साहित्य मिळून आले. विचारणा केली असता मैदानी चाचणीच्या अगोदर या गोळ्या, औषधे घेतल्यास त्याचा फायदा मैदानी चाचणीसाठी होत असल्याचे त्यांनी सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post