न्यू इंग्लिश स्कूल मोरामध्ये दोन दिवसीय स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन

 उरण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा  पुढाकार

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी तंत्रज्ञान आणि खेळणी यांची सांगड घालत उरण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल मोरा येथे दोन दिवस स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शासनमान्य शाळांचे स्पर्धात्मक कार्यक्रम 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून घेण्यात येतील. ज्यामध्ये कूट प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा , वकृत्व स्पर्धा, विज्ञान परिसंवाद , प्रतिकृती मूल्यांकन अशा स्पर्धा घेण्यात येतील.

    4 जानेवारी 2023  सकाळी 10.00 वाजता एक दिवसीय  विज्ञान प्रदर्शन जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मोरा या शाळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे उपाध्यक्ष श्री अनंताशेठ मोरू म्हात्रे हे आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पं. स. उरण श्री. संजय भोये साहेब हे असणार आहे. या प्रदर्शनात 100 पेक्षा जास्त विविध प्रयोग सादर करण्यात येणार आहे. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमधील विविध स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन यात  क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 4 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 3 वाजता बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सौ.ममताताई प्रितम म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. 

       3 आणि 4 जानेवारी रोजी विविध स्पर्धेत आणि विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पाहण्यासाठी तसेच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सर्व पालक,नागरिक आणि उरणकरांनी न्यू इंग्लिश स्कूल,मोरा येथे भेट द्यावी असे आवाहन पंचायत समिती उरण,शिक्षण विभाग आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post