पुणे शहरातील कोयता टोळीला कोयता पुरवणाऱ्या कोयता विक्रेत्यावर मोठी छापेमारी .

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कालच पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोबाईल मार्केटमध्ये कोयता गँगकडून दुकानांची तोडफोड करण्यात आली होती.यानंतर पुणे शहर पोलीस दलाच्या युनिट एकने कारवाई करत शहरातील कोयता टोळीला कोयता पुरवणाऱ्या कोयता विक्रेत्यावर मोठी छापेमारी  केली. पोलिसांनी या दरम्यान तब्बल 105 कोयते जप्त केले.

कोयते विक्री प्रकरणी युनिट 1 ने हुसेन राजगारा या दुकानदाराला अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या युनिट १ शाखेची ही मोठी कारवाई आहे. हुसेन राजगारा याचे दुकान रविवार पेठेतील बोहरी ओळीमध्ये आहे.  पोलिसांच्या तपासात राजगारा हा पुण्यातील अनेक तरुणांना कोयते पुरवत असल्याचे निदर्शनास आले होते.  यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्याच्या दुकानातून १०५ कोयते जप्त करण्यात आले आहेत.

 शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगच्या माध्यमातून दहशत माजविली जात आहे. याआधी सिहंगड कॅम्पस येथे दहशत माजवणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील 7 ते 8 जणांकडून अशाच पद्धतीने दहशत माजवण्यात आली होती. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. आता या गँगला कोयता पुरवणाऱ्या दुकानदारावर कारवाई करत कोयते जप्त करण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post