अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चुलत दिराचा भाभीजानवर बलात्कार

 खालापुर तालुक्यातील मधले हाळ खैरे गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना !

 खालापूर पोलिसांत अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल ; आरोपी फरार.


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील (मधला हाळ) खैरे येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेवर चुलत दिराने भाभी (वहिणी) वर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने हाळ गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी आणि पिडित महिला हे एकच परिसरात राहतात. पिडित महिलेने ८ जानेवारी २०२३ रोजी खालापूर पोलीस ठाणे येथे आरोपी नराधम चुलत दीर अस्मत इकबाल शेख याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० नुसार कलम ३७६, ३७६ (२) (n) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा पुढील तपास खालापूर पोलिसांकडून केला जात आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त अशी की,‌ खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील (मधला हाळ) खैरे येथे राहणारी पिडित महिला (वय ३५ वर्षे) गृहिणी असून ती वरील ठिकाणी तिच्या कुटुंबासह राहत असुन पती, २ मुले, सासु यांच्यासह एकत्र राहत आहे. पिडीत महिलेचा पती खोपोलीतील एका शाळेच्या बसवर चालक म्हणुन नोकरीस आहे. मे २०२२ मध्ये पिडीत महिलेचा पती कामावर गेल्यानंतर दुपारी ३ वाजण्याचे सुमारास पिडीत महिला एकटीच घरी असताना तिचा चुलत दिर अस्मत इक्बाल शेख‌ (रा. मधला हाळ, खैरे) याने तिला त्याच्या मोबाईल नंबर करून फोन करून मला तुझ्यासोबत महत्वाचे बोलायचे आहे. तु तुझ्या घराच्या पाठीमागे ये असे सांगितले. त्यावेळी काहीतरी महत्वाचे काम असेल या उद्देशाने पिडिता दिरास भेटण्यासाठी घराच्या पाठीमागील बाजुस गेली असता त्याठिकाणी अगोदरच तिचा चुलत दिर अस्मत शेख येऊन उभा राहिला होता. पिडीत महिला त्या ठिकाणी गेल्यानंतर तीने त्याला भाईजान काय झाले, मला का बोलाविले असे विचारले असता त्याने तिला तुझे गावामध्ये इतर लोकांशी अनैतिक संबध आहेत ते सगळे मला समजले आहे. मी तुझ्या नव-याला हे सगळे सांगणार आहे. असे सांगून घाबरविण्याचा प्रयत्न केला. त्यावर पिडीता माझे कोणाशी अनैतिक संबंध नाहीत तुम्ही माझी बदनामी करू नका असे बोलली. परंतु, त्याने तिला मी तुझ्या नव-याला सगळे सांगणार आहे असे सांगितले. त्यावेळी पिडित महिला घाबरली व माझ्या नव-याला काही खोटे- नाटे सांगेल, या भितीने त्याच्याकडे ती माफी मागु लागली. त्यावेळी तिचा चुलत दिर अस्मत याने शरीरसुखाची मागणी केली व तिला मिठी मारली. त्यावेळी पिडितीने त्यास विरोध केला परंतु त्याने तिचे काहीही न ऐकता जबरदस्तीने शरीर संबध ठेवुन अत्याचार केला. त्याचवेळी त्याने त्याच्या मोबाईलमध्ये तिचे अश्लील फोटो काढले होते. त्यानंतर दिर अस्मत याने तिला झाल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर सदरचे फोटो मी तुझ्या नव-याला दाखवेन अशी धमकी दिली. त्यानंतर अस्मत शेख याने मे - २०२२ ते ५ सप्टेंबर २०२२ चे दरम्यान वारंवार तिला फोटो प्रसारीत करण्याची धमकी देवुन लौजी, खोपोली येथील रूपाली सिन्हा यांचे बंद असलेल्या फ्लॅटवर बोलावुन घेवुन जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. सदरचा प्रकार पिडित महिलेच्या पती यास माहीत पडल्यास ते तिला सोडचिठ्ठी देतील व तिचा संसार मोडेल या भितीने तीने घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले नव्हते. त्यानंतर दि. ७ जानेवारी  २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता पिडित महिलेचा पती व पिडित महिला घरी असताना तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दिराची, अस्मत याची पत्नीही तिच्या घरी आली व तिच्या पतीस तिने सांगितले कि, तुझी बायको माझ्या नव-याला सतत फोन करत असते. त्यानंतर पिडित महिलेच्या पतीने तिला विश्वासात घेवुन त्याबाबत विचारणा केली असता तिने दिर अस्मत शेख याने केलेल्या अत्याचाराबाबत सर्व माहिती सांगितली. त्यानतंर पिडीत महिलेने पतीसोबत चर्चा करून दिर अस्मत इक्बाल शेख (रा. मधले हाळ, ता. खालापूर) याच्या विरूद्ध खालापुर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

कोट : -

आरोपी अस्मत शेख याने माझ्या पत्नीवर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ काढल्याचे सांगत ते व्हिडीओ युट्युब, इंस्टाग्राम व सोशल मीडियावर टाकून देईल तसेच तुझ्या नवऱ्याला सर्व फोटो,व्हिडीओ दाखवीन. तुझी सगळीकडे बदनामी करेल असे करीत माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करून पैश्याची लूट व शारीरिक संबंध करीत होता. असे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. तसेच पोलीस व मीडियाने मला मदत करावी, अशी विनंती पीडितेच्या पतीने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post