पुणे जिल्ह्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी कामाची धडाकेबाज चुणूक दाखविली.

बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन करणाऱ्यांवर गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाई केली

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे जिल्ह्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक म्हणून सहा महिन्यांपूर्वी रूजू झालेल्या चरणसिंग राजपूत यांनी कामाची धडाकेबाज चुणूक दाखविली. बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन करणाऱ्यांवर गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाई केली आहे.

गेल्या वर्षभरात संबंधितांवर 1870 गुन्हे दाखल केले असून 2006 आरोपींना अटक केली आहे. तर तब्बल 12 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याशिवाय 200पेक्षा जास्त चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामध्ये ही बाब समोर आली आहे. मद्याची अवैध यावर उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाया केल्या आहेत.

या कारवाईत 1870 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 2006 आरोपींना अटक करण्यात आली आहेत. 200 पेक्षा जास्त चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच या कारवायांमधून 12 कोटी 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.

आधीच्या वर्षभरात बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन केल्याप्रकरणी 1538 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच 1568 आरोपींना अटक करण्यात आली होती. या कारवायांमधून सात कोटी 95 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाच कोटी रुपयांचा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश मिळाले, असेही राजपूत यांनी सांगितले.परराज्यातील जप्त केलेले मद्य 33 हजार 807.39 बॅरल लिटर, तर गावठी देशी, विदेशी आणि बिअर अशा एकूण 22 हजार 200.89 बॅरल लिटर मद्यसाठा जप्त केला आहे. तसेच महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949च्या 68 आणि 84 कलमान्वये एकूण 26 गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये 84 आरोपींना चालू वर्षात न्यायालयाने एक लाख 74 हजार 300 रूपयांच्या दंडाबरोबर शिक्षा सुनावली आहे, असेही अधीक्षक राजपूत यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post