लोकक्रांती विकास आघाडी (महाराष्ट्र राज्य ) यांच्या वतीने मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न .प्रेस मीडिया लाईव्ह :

श्रीकांत कांबळे : 

इचलकरंजी ता. हातकणंगले येथे मकर संक्रांतीच्या निमित्त लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने तिळगुळ वाटपाचा  तसेच महिला पदाधिकारीच्या वतीने हळद कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना  तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत शुभेच्छा दिल्या तर महिला पदाधिकारीच्या वतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला. 


यावेळी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मकर संक्रांतीचा गोडवा असंच सर्वामध्ये कायम राहो असे मनोगत व्यक्त केले  

   यावेळी लोकक्रांती विकास आघाडीचे  अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर,उपाध्यक्ष नागेश क्यादगी, कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबोले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ.शोभा वसवडे,जिल्हाध्यक्ष अशोक ठोमके, राजू शेख, दिलीप रेपे, सखाराम जाधव(संपादक) श्रीकांत कांबळे, मुकुंद शेंडगे, सुरज पवार, आफ्रिदी नदाफ, सिंधू बडवे, रेशमा मुजावर,गंगा कांबळे, पांडुरंग पाटील, सारिका कुंभोजकर,धनश्री कुंभोजकर, सुनिता डांगरे, शिवाजी करडे, प्रभाकर भोंगे, दिलीप सुतार,तानाजी शिंदे, दगडू कांबळे उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post