गांधीभवन मैदानावर शुक्रवारपासून खादी प्रदर्शन, विक्री



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ च्या वतीने गांधीभवन मैदानावर खादी प्रदर्शन, विक्री केंद्र उभारण्यात आले आहे.  महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन  यांच्या हस्ते ६ जानेवारी रोजी  ११ वाजता  उद्घाटन करण्यात येणार आहे .खादी कापडचे प्रदर्शन व विक्री १५ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते  रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

विविध प्रांतातील वेगवेगळ्या दर्जाच्या शुद्ध खादी वस्त्रे, तयार कपडे उपलब्ध करण्यात आली आहेत. नव-नवीन डिझाईन चे शर्ट, गांधी टी- शर्ट, कुर्ता, पायजामा, जॉकेट आहेत.लुंगी, टॉवेल, शर्टिंग व कोटिंग उपलब्ध आहे.साड्यांमध्ये खादी साडी, कोसा साडी प्रदर्शनात आहे.ड्रेस मटेरियल, लेडिज टॉप, रुमाल, बेडशीट, खेस चादरी, स्प्रे-दरी, उलन शॉल, कोसा शॉल व लेडीज बॅग यांचा समावेश या प्रदर्शनात आहे.सुती खादी वर २० टक्के सूट तर   कोसा कापड वर १५ टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सर्वोदय मंडळाचे अॅड. संतोष म्हस्के,  किशोर  फुलंबरकर  इत्यादी मान्यवर उद्घाटन प्रसंगी  उपस्थित राहणार आहेत.अधिक माहितीसाठी संपर्क ७८७५०८६४१८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.








Post a Comment

Previous Post Next Post