स्त्रियांची सुरक्षितता आणि हक्कांचे रक्षण हेच माँसाहेबांना खरे अभिवादन - डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुंबई, दि. ६: आज माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती दिवशी साजऱ्या होणाऱ्या *ममता दिनाच्या* निमित्ताने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की माँसाहेबांची माया ही सर्वांनी अनुभवलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय देशभरात आज साजऱ्या होणाऱ्या ममता दिनाच्या निमित्ताने आपल्याला येत आहे.

यानिमित्ताने विविध शाळा कॉलेजांमधून सेफ कॅम्पस ही मोहीम राबवून विद्यार्थिनी आणि युवतींची सुरक्षितता यांकडे विशेष लक्ष देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. याचाच एक भाग म्हणून पुढील काळात विविध शाळा-कॉलेजांना भेटी देणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी याप्रसंगी सांगितले.

माँसाहेबांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त सर्वच स्त्रियांना त्यांचे हक्क, सुरक्षितता आणि स्वयंपूर्णता जास्तीत जास्त परिपूर्णतेने मिळणे हेच माँसाहेबांना खरे अभिवादन ठरेल अशी भावना डॉ. गोऱ्हे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post