एकविरावरून गगनगिरीला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

 बसचा ब्रेक फेल झाल्याने बस झाडाला धडकून बोरघाटात पुन्हा अपघात प्रेस मीडिया लाईव्ह :

खोपोलीतील बोरघाट नावाच्या अपघात घाटात आज पुन्हा रॉंगसाईटने खोपोली शहरात उतरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला. बामा म्हात्रे विद्यामंदीर, कोपर, डोंबिवली या शाळेतील तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची बस ज्यामध्ये ६ शिक्षक व ६४ विद्यार्थी होते. ती एकविरा येथून दर्शन आटोपून जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून गगनगिरी आश्रम खोपोली येथे जात असताना बोरघाटातील शिंग्रोबा मंदीराच्या पाठीमागील घाटामध्ये बसचा ब्रेक फेल झाल्याने बस झाडाला धडकून अपघात झाला.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक गौरी मोरे, बोरघाट पोलीस यंत्रणेचे पीएसआय  योगेश भोसले व महेश चव्हाण, आयआरबीचे सेफ्टी ऑफिसर शिंदे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड आदींनी तत्काळ घटनास्थळ गाठून बचाव कार्य करीत बसमधील विद्यार्थी, शिक्षक यांना पिण्याचे पाणी आणि खाण्याचा बंदोबस्त केला. तसेच ॲम्बुलन्सच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना गगनगिरी आश्रमामध्ये सुखरूप पोचविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. बस बाजूला घेवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.


 खोपोली रायगडवरून महाराष्ट्र स्टेट ब्युरो चिफ खलील सुर्वे यांची रिपोर्ट.

Post a Comment

Previous Post Next Post