मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'दैनिक कोकण प्रजा'चे संपादक फिरोज पिंजारी यांना राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार प्रदानप्रेस मीडिया लाईव्ह :

आज मराठी दर्पण पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर अप्रतिम मीडियाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'राज्यस्तरीय चौथास्तंभ विकास पत्रकारिता' पुरस्काराने अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा दैनिक कोकण प्रजा, केपी न्यूज चैनल, कोकण प्रवाह & इंटरपोल वेब पोर्टलचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी यांना गौरविण्यात आले.मागील चौदा वर्षापासून फिरोज पिंजारी पत्रकारीता करीत असून मास कम्युनिकेशन अन्ड जर्नालिझममध्ये त्यांनी मास्टर डिग्री घेतली आहे. जळगांव दैनिक सकाळपासून त्यांनी पत्रकारीतेचा शुभारंभ केला होता. पुणे, मुंबई, हैद्राबाद, नोएडा, दिल्ली असा प्रवास करीत खोपोली रायगडवरून देशभर पत्रकारीता करीत आहेत. 

सध्या ते अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव, राष्ट्रीय मंसुरी समाज महाराष्ट्र राज्य मिडीया प्रभारी, स्वाभिमानी मिडीया असोसिएशन संस्थापक अध्यक्ष आदी विविध पदे ते आज भूषवित आहेत. 

फिरोज पिंजारी पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी दिवसरात्रं लढत आहेत, त्यांनी देशभरातील अनेक पत्रकारांना न्याय मिळवून दिला आहे. सन 2021-22 या वर्षात खोपोली, खालापूरसह रायगडातील आरोग्य विषयक बातम्या प्रकाशित केल्या होत्या, याची दखल घेत अप्रतिम मीडियाच्या वतीने आरोग्य पत्रकारीता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी एमएस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक अभिजीत पाटील, सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, अप्रतिम मीडीयाचे संचालक अनिल फळे, विवेक देशपांडे, रणजीत कक्कड, प्रीतम फळे, निशांत फळे, केपी न्यूज स्टेट ब्युरो चिफ खलील सुर्वे, फैजल फिरोज पिंजारी आदी उपस्थित होते. मुंबईवरून महाराष्ट्र स्टेट ब्युरो चिफ खलील सुर्वे यांची रिपोर्ट.

Post a Comment

Previous Post Next Post