मेन राजाराम हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज कोल्हापूर येथे दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी स्नेह संमेलन व क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण पार पडले.प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर  : मेन राजाराम हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज कोल्हापूर येथे दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी स्नेह संमेलन व क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण पार पडले. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांचा एकत्रित असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रथम क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नाईक एस. एस. यांच्या हस्ते झाले. 

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या अध्यापिका सौ. पठाण एच. जे. आणि महाविद्यालयाच्या अध्यापिका सौ. पाटील एस. ए. यांनी केले. एकूण 30 स्पर्धक गटाचे सादरीकरण झाले. श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित कॉलेज  ऑफ एज्युकेशन पेठ वडगाव येथून आंतरवासिता प्रात्यक्षिकासाठी आलेल्या कॉलेज  ऑफ एज्युकेशन पेठ वडगांव च्या प्राचार्य व आंतरवासिता गटाच्या मार्गदर्शिका सौ. निर्मळे आर. एल  छात्रमुख्याध्यापिका सौ. नामे व्ही. डी व इतर छात्रध्यापक कु.कुलकर्णी .पी .पी , कु.पाटील .एस .बी,  कु. वड्डर ए. एस, कु. पाटील .एस.डी,सौ पाटील. पी . एस मॅडम व कु कापडे. ए.के सर या गटाने बसवलेले विद्यार्थ्यांचे सादरीकरण देखील धमाकेदार झाले. स्पर्धेकांसोबत प्रेक्षकांचा सहभाग तेवढाच दर्शनीय होता. संपूर्ण कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post