ऑल रजिस्ट्रर्ड न्युज पेपर्स असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

मिरज : ऑल रजिस्ट्रर्ड न्युज पेपर्स असोसिएशनच्या वतीने व युवा ग्रामचे कार्यकारी संपादक राहूल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार दिन विविध कार्यक्रमाने मिरज पंढरपूर रोडवरील महानगरपालिका शाळा नंबर १९ मध्ये संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी एकनाथ पवार होते त्यांनी या ६ जानेवारी पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या व शासनाकडून विविध योजनांची माहिती सर्व संपादकांना व पत्रकारांना दिली. तसेच शासनाकडून असणाऱ्या सुविधांचा उपभोग घेण्यासंदर्भात सुचना व आव्हान केले.


चॅनेल व साप्ता. तिचा जागरच्या संपादिका शर्वरीताई पवार यांनी परिसरातील विद्यार्थ्यांना, स्त्रियांना आपण कसे सक्षम असावे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. व त्यांनी स्वतःवरुन आयुष्यात घडलेल्या घडामोडीवर उहापोह केला. व त्यांच्या कार्याबद्दलची प्रेरणादायी माहिती नव्या पिढीला दिली.

इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी ऑल रजिस्ट्रर्ड न्युज पेपर्स असोसिएशन संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. व प्रगत हिंदुस्थानचे संपादक दिपक ढवळे यांना सामाजिक कार्यासह पत्रकारी क्षेत्रात गेली १९ वर्षे एकत्रित कार्य करीत असल्याबद्दल व त्यांचे पत्रकारांच्या व पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात एक लढवय्या संपादक असल्याचे संबोधले. असेच सर्वांनी आपल्यापरीने कार्यकरीत रहावे आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत असे सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष गणेश आवळे, अर्जुन यादव, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकाचे माजी सभापती सुरेश आवटी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकाचे नगरसेवक शिवा दुर्वे, सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाची बाळशास्त्री जांभेकराच्या प्रतिमेस पुष्पहार व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेतील मुलांना खाऊ वाटप, ५० प्रकाराचे वृक्षारोपण मान्यवरांच्या व संपादकांच्या हस्ते परिसरात करण्यात आले. त्यानंतर प्रगत हिंदुस्थान दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व सेवासदन हॉस्पिटलच्या सहकार्याने पाच प्रकारच्या आरोग्य तपासणी जवळपास २९० नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यावेळी ऑल रजिस्ट्रर्ड न्युज पेपर असोसिएशनचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर असोसिएशनचे सर्व संचालक व युवा ग्राम वार्ताचे संपादक अॅड. धैर्यशील मोरे यांनी केले.

यावेळी सांगली जिल्हा वृत्तवाहिनी जिल्हा सचिव राजेंद्र कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष अर्जुन यादव, एबी न्यूज बुरो चीफ इम्तियाज शेख, वृत्तवाहिनी मिरज शहर अध्यक्ष गणेश आवळे, शहर सचिव कौसीन मुल्ला, महान नेताचे संपादक शाहिर खराडे, स्वास्थ्य फॅमिले केअरचे कार्य संपादक प्रविण उपाध्ये, कुंभशिल्पचे संपादक नित्यानंद कुंभार, नाभिक बांधवाचे संपादक रोहित जाधव, मिरज वार्ताचे संपादक नजीर झारी, मिरज गर्जनाचे संपादक विकास कुलकर्णी,

मिरज हेरॉल्डचे संपादक बाळासाहेब शिंदे, घरप्रमुखचे संपादक धोंडीराम शिंदे, कुसुमगंधचे संपादक विजय हुबाळे, मुल्लांनी जागृत जीवनसंदेशचे संपादक सुधाकर पाटील, सारांशचे संपादक अनिल दबडे, पत्रकार आयुब खान जमादार पुण्यनगरी आदेश अहिल्याचे संपादक ईश्वर हुलवान, चंद्रकांत शेंडगे, दरारा संघटनेचे अध्यक्ष संतोष पाटील, अॅड. बाळासाहेब वाघमोडे, नंदकुमार सुर्वे, धनंजय शिंदे, युवराज कांबळे, कार्य संपादक अमरजीत चोपडे, पंकज नाईक, स विकास मोरे, मिरासाहेब गजगेश्वर, नितीन निकम, दादासाहेब

भोसले, अमोल मोरे, किरण दोरकर,9महानगरपालिका शाळा नं. १९ चे मुख्याध्यापक अरुण कदम, सकटे सर यांनी शाळेच्या आवारामध्ये मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक साप्ता. स्वातंत्र माहिती अधिकारचे कार्य संपादक शाहिन शेख यांनी केले. तर आभार ऑल रजिस्ट्रर्ड न्युज पेपर असोसिएशनचे संस्थापक सचिव दिपक ढवळे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post