कन्या व कुमार विद्या मंदिर तारदाळ येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी :  श्रीकांत कांबळे

तारदाळ ता.हातकणंगले येथील कन्या व कुमार  विद्या मंदिर यांचे वतीने दि. 26 जानेवारी रोजी भारतीय  प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमानी संपन्न करण्यात आला . सर्व प्रथम कन्या विद्या मंदिर तारदाळ येथील इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांनी कु. श्रेया पाटील यांच्या आईवडिलांच्या हस्ते ध्वजापुजन व ध्वजारोहण  तारदाळ गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.पल्लवी पोवार व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

     तसेच विधार्थ्यांच्या कडुन विविध प्रात्यक्षिक करण्यात आली त्यामध्ये लाठीकाठी व तलवारबाजी प्रात्यक्षिक उत्कृष्टपणे केले. तसेच विविध कला, क्रिडा, व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या  विधार्थ्यींनी व विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

         यावेळी मुख्याध्यापक, विलास कोळी , विजयकुमार चौधरी, ग्रामसेवक बाबासाहेब कापसे, सचिन पोवार, चंद्रकांत तांबवे, सुरज कोळी प्रवीण पाटील, प्रवीण केर्ले, डॉ. अमोल पाटील, विमल पोवार, सुवर्णा दात्ते पूनम जाधव, लक्ष्मी चौगुले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. तांबवे,  सौ. पाटील,तसेच शिक्षक शिक्षिका  व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post