ठाकरे नगर तारदाळ येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  : श्रीकांत कांबळे 

     हातकणंगले तालुक्यातील तारदाळ मधील ठाकरे नगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाकरे नगर विकास समिती यांच्यावतीने दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.



   प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळच्या सत्रामध्ये ठाकरे नगर मधील अंगणवाडी क्रमांक २१० येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले .यावेळी ध्वज पूजन अनिल नर्मदे (कॉन्ट्रॅक्टर)यांचे हस्ते व ध्वजारोहण उद्योगपती किरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अंगणवाडी मधील लहान मुलांनी दिलेल्या भारत माता की जय घोषणाने परिसर दुमदुमला. यावेळी ठाकरे नगर समितीचे अध्यक्ष आप्पा पवार, उपाध्यक्ष संदीप खोत, प्रमोद परीट अंगणवाडी शिक्षिका सारिका नाईक, वैशाली चौगुले, विशाल पवार ,सचिन भोसले आदींसह पालकवर्ग  व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  तसेच सायंकाळच्या सत्रामध्ये ठाकरे नगर विकास समितीच्या वतीने लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुनील स्वामी सर यांचे भारताचे संविधान व देशासाठी सैनिकांचे योगदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी स्वामी सर आपले मनोगत व्यक्त करताना, भारताचे संविधान हा आधुनिक भारताचा प्राण आहे. संविधान अस्तित्वात आहे तोपर्यंत राष्ट्र या अर्थाने भारताचे अस्तित्व आहे. संविधान हाच भारताचा आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा मुख्य आधार आहे. आपल्या जगण्याशी, अवतीभोवती घडणाऱ्या प्रत्येक व्यवहाराशी संविधानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहे. असे सांगत आपल्यासाठी संविधानचे महत्त्व पटवून दिले. सदर व्याख्यान कार्यक्रमानंतर वीरमाता, वीरपत्नी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही महिन्यापूर्वी तारदाळ येथील सिग्नल रेजिमेंट रँक मधील जवान निलेश खोत हे सेवा बजावत असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले .

 या स्मृतीपित्तर्थ त्यांच्या वीरमाता कांता खोत, वीर पत्नी प्रियंका खोत व वीर कन्या श्राव्या खोत यांचा सन्मान सोहळा आमदार प्रकाश आवाडे , जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे,तारदाळ गावच्या लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार, उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, माजी सरपंच यशवंत वाणी, माजी पंचायत समिती सदस्य अंजना शिंदे , जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर ,जनता बँकेचे नूतन संचालक चंद्रकांत चौगुले, सूर्यकांत जाधव ,चंद्रकांत तांबवे ,विमल पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला. 

 यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी शहीद जवान निलेश खोत यांच्या वीर पत्नी प्रियंका खोत यांना एक लाख रुपये ची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच ठाकरे नगर विकास समितीच्या निवेदनानुसार ठाकरे नगर गल्ली नंबर एक ते बारा मध्ये आरसीसी गटर्स व रस्ते लवकरात लवकर करणार असल्याचे ग्वाही त्यांनी दिली.यावेळी प्रास्ताविक प्रमोद परीट यांनी तर सूत्रसंचलन व आभार ज्योती खोचरे यांनी केले.यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधित ठाकरे नगर विकास समितीच्या वतीने स्नेह भोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी ठाकरे नगर मधील नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post