श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचालित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठ वडगाव येथेप्रथम वर्ष बी.एड. स्वागत समारंभ व बक्षीस वितरण"कार्यक्रम संपन्न


प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचालित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठ वडगाव येथे दि.१८ जानेवारी,२०२३, बुधवार रोजी महाविद्यालयामध्ये "प्रथम वर्ष बी.एड. स्वागत समारंभ व बक्षीस वितरण"कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  मा.श्री. खासदार धैर्यशील माने (दादा) साहेब व प्रमुख उपस्थितीमध्ये श्री बाळासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विजयसिंह माने साहेब ,तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ निर्मळे आर. एल.आणि कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री सचिन पाटील (सर) ई.मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका शिरतोडे व्ही.एल. यांनी केले. पाहुण्यांची ओळख छात्राध्यापिका ज्योती शेटे यांनी केले. त्यानंतर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी ज्यांनी विद्यापीठ स्तरावरील बी.एड. परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे अशा विद्यार्थ्यांचे ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  प्रथम वर्षाच्या मुलांचे पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. 2021- 22 वर्षांमध्ये राबवलेल्या विविध स्पर्धांमध्ये गुणांकन प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. द्वितीय वर्ष बी. एड. मधील रोलर स्केटिंग या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर सिल्वर मेडल प्राप्त तेजस्विनी कदम हीचाही  सत्कार करण्यात आला.त्यानंतर माजी विद्यार्थी विद्याधर कांबळे, अमृता जाधव या विद्यार्थ्यांचे मनोगत झाले.  कु.तेजस्विनी कदम हिनेही मनोगत व्यक्त केले. द्वितीय  वर्ष बी.एड. छात्राध्यापक प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रथम वर्षाचे विद्यार्थी पंडित शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे खासदार साहेब व प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष साहेब यांनी प्रथम वर्ष बी.एड.छात्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या. फार्मसीचे प्राचार्य पाटील सर यांनी  विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.  ‌अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे मॅडम यांनी छात्राध्यापकांना विशेष मार्गदर्शन केले. बी.एड. करत असताना कोणत्या पद्धतीने ज्ञान प्राप्त केले पाहिजे व त्याचा उपयोग सध्य परिस्थितीमध्ये व भविष्यात कसा होईल . त्यातून स्व- विकास कसा साधावा याची माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.सोरटे सर यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका वृषाली मुंडे व सुजाता कुंभार यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्रा.हाबळे सर ,प्राध्यापिका सावंत मॅडम, प्राध्यापिका चरणकर मॅडम, ग्रंथपाल चौगुले मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी व  b.ed प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व छात्राध्यापक व छात्राध्यापिका उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post