एलसीबी रायगड व रोहा पोलिसांची धडक कारवाई, रोह्यात दीड किलो गांजा जप्त, आरोपी जेरबंद

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

रोह्यात काही महिन्यांपासून अनधिकृत अमलीपदार्थाची विक्री व्यवसाय खुले आम जोरात सुरु असल्याची चर्चा सार्वत्रिक रंगली होती. याची खबरएलसीबी रायगड व रोहा पोलीस पथकाला मिळताच या पथकाने अनधिकृत विक्री करणारे यांच्यावर करडी नजर ठेवत धडक कारवाई करत आरोपी अहमद बडे याला रंगेहाथ पकडून त्याच्याकडून तब्बल दिड किलो गांजा जप्त करत आरोपी अहमद बडे याला ताब्यात घेत त्याला अटक करण्यास रोहा पोलीस यशस्वी ठरले आहे

रोह्यात अवैध धंदे कोणालाही न जुमानता बिनधास्तपणे खुले आम सुरु असल्याची चर्चा गेली अनेक दिवस सुरु होती. अनधिकृत गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळताच एलसीबी रायगड व रोहा पोलीस पथकाने त्यांच्यावर पालथ ठेवून संयुक्तपणे सापळा रचून स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साठे, पो.ह. खैरनाथ, पो.नाईक जाधव, पो. सी. सावत यांसह पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सहा. पो.नि. हिवरकर, पो.ह. पिटर कांबळे, पो.ह. पैसाले, पो.सी. पोटकर, पो.सी ढेरे, या पथकाने घटनास्थळी जाऊन आरोपी अहमद बडे याला मुद्देमालासहीत रंगेहाथ पकडण्यात आले.

आरोपी अहमद बडे याच्या कडून तब्बल दिड किलो गांजा जप्त करण्यात आले. याविषयी रोहा पोलीस ठाणे गु र क्र 5 /22 कलम NDPS ACT 1985 , 8(C), 20(B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक पुढील तपास रोहा पो. नि. प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post